- नियम -

राजा शिवछत्रपती परिवार - सर्वसाधारण प्रवेश नियम

या नियमांची गरज तशी शिव'शंभुंच्या आदर्शावर चालणाऱ्या मावळे/रणरागिणीला नाही. तरिही काही अती हुशार जे शिवकार्यापासुन भटकत जाऊन गैरव्यवहार करतात त्यांच्यासाठी हे नियम आहेत. त्यांच्यासाठी हा परिवार नाहीच.

१. परिवारचे सर्व नियम आणि निर्णय आपल्याला पाळावेच् लागतिल.

२. आपल्या परिवारमध्ये मावळे आणि रणरागिणी यांच्यात आपआपसात फक्त आणि फक्तच् भाऊ-बहिण/आई-वडिल (साखरपुडा झालेले/विवाहित पती-पत्नी खेरीज) नातं असल्याने कोणीही कोणत्याही प्रकारचे नविण नाते (प्रेम संबंध/गैरवर्तणुक वगैरे.) प्रस्थापित करु नये अथवा प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही करू नये. तसे काही निदर्शनास आल्यास सदर व्यक्तीस योग्य ती कारवाई करुन सदर मावळा/रणरागिणीला परिवार मधुन हाकलुन देण्यात येईल. तसेच सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडल्यास त्या मावळा/ रणरागिणीशी परिवारचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसेल.

३. परिवार मधिल मावळे/रणरागिणी सोबत आर्थिक किंवा ईतर कोणत्याही प्रकारचे व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करणे. जर व्यवहारात कोणत्याही प्रकारचा अडथळा आल्यास त्या व्यवहाराशी परिवारचा तिळमात्रही संबंध नसेल.

४. परिवार कोणत्याही प्रकारच्या हिंसक वृत्तीला/प्रकरणाला तसेच यामध्ये हात असणाऱ्या मावळा/रणरागिणीला सहकार्य करत नाहीच.

५. प्रत्येकाला स्वतःच्या जात - धर्म - पंथ बद्दल अभिमान असायलाच हवा. पण परिवार मध्ये आपण फक्तच माणुस बनुन राहुया..

६. 'शिव'शंभुंच्या आदर्शावर चालणार्यांनीच या परिवार मध्ये रहावे.

७. परिवार मध्ये फक्तच् 'मातृभाषा' मराठी वापरावी. (इतर भाष्यांचा तिरस्कार नव्हे.)

८. आपण कोणीही मोठी/छोटी व्यक्ती असाल या परिवार मध्ये एक मावळा/रणरागीणी म्हणुनच राहुया.

९. मुख्य/विभागीय अष्टप्रधानला न विचारता परिवारामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा/प्रश्न विचारु/करु नये.

१०. स्त्रीयांचा अनादर मुळीच खपऊन घेतला जाणार नाही.

११. हा राजकारण विरहित परिवार असल्याने कृपया राजकारण बाहेरच् सोडुन यावे.

१२. परिवार मध्ये सर्वांशी 'आदराने' बोलावे. (आदर द्या... आदर घ्या) एकेरी उल्लेख चालणारच् नाही.

१३. परिवारचा वाढता पसारा पाहता निव्वळ नियोजनासाठी म्हणुन जिल्ह्यानुसार विभागिय गृप बनवले गेले आहेत. तेंव्हा जिल्ह्यांमध्ये श्रेष्ठत्वाची भावना नसावी.

१४. खरा/खोटा इतिहास उकरुण काढण्यापेक्षा तोच वेळ आपण शिव'कार्य करण्यासाठी खर्च करुया.

१५. आपल्याला फक्तच् शिव'शंभुंनी दाखविलेल्या आदर्शावर /रस्त्यावर चालायचं आहे हे विसरु नये.

१६. लक्षात ठेवा, आपणाला फक्तच् आपल्या कार्यातुन समाज परिवर्तन करुण देश घडवायचा आहे, समाजात तिढा नव्हे !

१७. परिवार मध्ये आपल्यामुळे गोंधळ होऊ नये याची दक्षता नेहमी ठेवा. (तुम्ही कोणत्याही इतर संस्था/गृप/प्रतिष्ठान/ संघटनेचे... वगैरेचे असाल पण इथ फक्त राजा शिवछत्रपती परिवारचे बनुन रहा. इतर संघटनेच्या विचारधारा त्यांच्या त्यांच्यासाठी बरोबर असु शकतात, पण त्या विचारधारेचा वापर किंवा तुलना या परिवार सोबत करू नये)

१८. परिवार मध्ये समाविष्ट झालेला मावळा/रणरागिणी यांनी मुख्य मोहीम/विभागिय मोहीमेला ४ महिन्यातुन किमान एक मोहीमेला सहभाग दाखवणे बंधनकारक आहे.

१९. परिवार मधिल रणरागिणी यांनी परिवारच्या मुख्य मोहीम/ सांस्कृतिक कार्यक्रम वेळी साडी/सलवार - कुर्ता परिधान करणे बंधनकारक आहे.

२०. ज्या संस्था/संघटना/प्रतिष्ठान/गृप वगैरे परिवार विरोधी आहेत किंवा परिवारची निंदा/तिरस्कार वगैरे करतात. अशा कोणत्याही संस्थेसोबत तुम्हाला काम करता येणार नाहीच.

२१. परिवारशी आपले नाते हे प्रामाणिक आणि आपुलकीचे तसेच निष्ठेचे असावे, कारण हा आपला सर्वांचा परिवार आहे.

बाकी आपण स्वतः जाणते तथा सुज्ज्ञ आहातच !

टिपः  परिवाराच्या विभागीय तसेच इतर मोहिमेंला येणे वेळेनुसार बंधनकारक आहे. तसेच ज्यांना परिवाराचे नियम आणि निर्णय मान्य नसेल त्यांनी परिवार मध्ये थांबायची आवश्यकता नाहिच.

"आलात तर तुमच्या सोबत, नाहीतर तुमच्या शिवाय !"

"चला, नियमात राहुन शिव'कार्य करुया...!"